Ad will apear here
Next
डॉ. राजेंद्रसिंह यांना ‘महापालक राष्ट्रीय सन्मान’ जाहीर
मीना सिंह आणि डॉ. राजेंद्रसिंह राणा
पुणे : डीपर, सर फाउंडेशन व ‘तुम्ही-आम्ही पालक’ यांच्यातर्फे आंतरराष्ट्रीय पालकदिनाच्या निमित्ताने दिला जाणारा ‘महापालक राष्ट्रीय सन्मान’ पुरस्कार यंदा जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा आणि मीनासिंहजी यांना, तर ‘संस्थापालक सन्मान’ पुरस्कार वरोरा येथील ज्ञानदा जीवन विकास केंद्राचे संस्थापक प्रा. मधुकर उपलेंचवार यांना जाहीर झाला आहे. 

‘कोथरूड येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन येथे २१ आणि २२ जुलै रोजी होणाऱ्या कार्यक्रमात हे सन्मान प्रदान केले जाणार आहेत’, अशी माहिती डीपर, सर फाउंडेशन व साद माणुसकीची फाउंडेशनचे संस्थापक हरीश बुटले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

प्रा. मधुकर उपलेंचवार
बुटले पुढे म्हणाले, ‘एक लाख रुपये रोख, शाल, श्रीफळ, मानपत्र आणि सौभाग्यलंकार असे महापालक सन्मानाचे, तर ५१ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ व मानपत्र असे संस्थापालक सन्मानाचे स्वरुप आहे. संस्थेच्या वतीने आयोजित दोन दिवसांच्या या कार्यक्रमात २१ जुलै रोजी संस्थापालक सन्मान व २२ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय पालकदिनी महापालक राष्ट्रीय सन्मान प्रदान केला जाणार आहे. महापालक सन्मान सोहळ्यासाठी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून, तर लातूर येथील विवेकानंद हॉस्पिटलचे संचालक डॉ. अशोक कुकडे अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. संस्थापालक सन्मान सोहळ्यासाठी सह्याद्री हॉस्पिटलचे डॉ. चारुदत्त आपटे प्रमुख अतिथी म्हणून, तर माजी आमदार उल्हासदादा पवार अध्यक्ष म्हणून लाभले आहेत. याशिवाय, वैद्यकीय व इंजिनियरिंगच्या प्रवेश परीक्षेमध्ये प्रथम येणाऱ्या डीपरच्या विद्यार्थ्यांचा आणि सेवानिवृत्त शिक्षक-कार्यकर्त्यांचा सत्कार केला जाणार आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. रवींद्र कोल्हे, दिलीप अरळीकर, डॉ. राजाभाऊ दांडेकर उपस्थित राहणार आहेत.’ 

‘या वेळी ‘तुम्ही-आम्ही पालक’ मासिकाच्या सहाव्या वर्षाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन, तसेच खेड्यांचे सर्वंकष मूल्यमापन करण्यासाठी तयार केलेल्या ‘साद ग्राम’ या अॅ पचे अनावरण होईल. दोन्ही दिवशी विविध विषयांवर परिसंवाद होणार आहेत. यामध्ये माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे, कुडाळ येथील भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, ‘जडण-घडण’चे संपादक डॉ. सागर देशपांडे, अर्थक्रांती प्रतिष्ठानचे विश्वस्त यमाजी मालकर सहभागी होणार आहेत. उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा. शुभांगी आणि डॉ. विनय कोपरकर या दांपत्याशी ‘सहसंवाद : कृतार्थ सहजीवनाचा’ विषयावर गप्पा रंगणार आहेत. संध्याकाळी जुन्या हिंदी-मराठी गीतांचा कार्यक्रम होणार आहे. दुसर्यास दिवशी मार्गदर्शन व कार्यकर्ता संवाद होणार असून, त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते ईश्वरलाल परमार, दीपस्तंभचे यजुर्वेंद्र महाजन, रूरल रिलेशनचे प्रदीप लोखंडे व सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर सहभाग घेतील. ‘ग्रामीण विकासात स्वयंसेवी संस्थांचे योगदान’ या सामाजिक विषयावरील परिसंवादात आदर्शग्रामचे अध्यक्ष पोपटराव पवार, मध्यप्रदेशातील नर्मदालयाच्या भारती ठाकूर, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. उदय वारुंजीकर, स्नेहालयचे डॉ. गिरीश कुलकर्णी सहभागी होणार आहेत. त्यानंतर कार्यकर्ता प्रशिक्षण होणार आहे’, असेही हरीश बुटले यांनी सांगितले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/ZZPMBQ
Similar Posts
‘टिळकांचे विचार दांडेकर दाम्पत्याने कृतीत उतरवले’ पुणे : ‘डॉ. राजाभाऊ आणि रेणू दांडेकर यांनी कौशल्यपूर्ण, प्रकल्पाधारित शिक्षणातून चिखलगावमध्ये विद्यार्थी घडविले आहेत. कठीण प्रसंगालाही सामोरे जाणारे विद्यार्थी घडविण्याचे काम हे दाम्पत्य करीत आहे. शिक्षणासंबंधी लोकमान्य टिळकांनी मांडलेले विचार आचरणात आणून ते कृतीत उतरविण्याचे कार्य दांडेकर दाम्पत्याने केले आहे
डॉ. राजाभाऊ, रेणू दांडेकरांचा सन्मान पुणे : आंतरराष्ट्रीय पालक दिनाचे औचित्य साधून ‘तुम्ही-आम्ही पालक’ मासिकाच्या वर्धापदिनानिमित्त डीपर व सर फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा ‘महापालक सन्मान २०१७’ सामाजिक कार्यकर्ते डॉ. राजाभाऊ व रेणू दांडेकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विकास
‘संस्कारक्षम शिक्षणाच्या अभावाने समाजात असंवेदनशीलता’ पुणे : ‘मन आणि बुद्धी यांची फारकत झाली, तर माणूस घडत नाही. सद्यस्थितीत शिक्षण क्षेत्रात अपप्रवृत्तींचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे शिक्षणव्यवस्थेत संस्कार आणि मूल्यांचा अभाव आहे. परिणामी समाजात असंवेदनशीलता फोफावत आहे. माणसातील आपुलकी लोप पावते आहे. त्यामुळे संस्कारक्षम शिक्षण आणि राज्यघनेतील मूल्ये मुलांमध्ये
‘विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केंद्रस्थानी असावा’ पुणे : ‘केवळ गुणांवर आधारित आणि पुस्तकी शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांची बौद्धिक पातळी मोजली जात आहे. गुणांच्या फुगवट्याने विद्यार्थ्यांचे सर्वंकष मूल्यमापन होत नाही. त्यामुळे दहावीत शंभर टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यालाही महाविद्यालयीन स्तरावर नापास होण्याची वेळ येते. शिवाय, नोकरीच्या ठिकाणी त्याला असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language